Sangli Samachar

The Janshakti News

विशाल दादांवर झालेल्या अन्यायामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता उद्विग्न



सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४

ज्या वसंतदादांनी छातीवर गोळ्या झेलून सांगलीमध्ये काँग्रेस रुजवली, वाढवली. महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रसार केला, त्याच वसंतदादांच्या नातवावर उमेदवारीसाठी धावाधाव करावी लागून पाठीत खंजीर खूप असल्याची भावना सांगलीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. परिणामी पुन्हा एकदा नेते व्यासपीठावर कार्यकर्ते विशालदादांच्या प्रचारात असे चित्र निर्माण होणार आहे.

“हा प्रकार निषेधार्ह आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते जो निर्णय घेतील, त्याला आम्ही बांधील आहोत. पण जे घडलं, ते अत्यंत वाईट घडलं. सांगली जिल्हा हा वसंतदादाचा जिल्हा, पंतगराव कदम यांचा जिल्हा, मदनभाऊंचा जिल्हा, विश्वजीत कदम यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याचा इतिहास जरा सुद्धा तपासला नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. असे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता बोलून दाखवत आहे.


जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उद्रेक दर्शवण्यासाठी शशिकांत नागे या कार्यकर्त्याची बोलकी प्रतिक्रिया पुरेशी आहे. “इथला कायकर्ता स्वयंभू, घरंदाज आहे. काँग्रेसची परंपरा असलेला जिल्हा आहे. डोळे भरुन आले आहेत, रडायचा राहिलोय, वेळ आल्यावर उद्रेक होईल. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये, म्हणून ज्यांनी कट कारस्थाने केली, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार” असा इशारा शशिकांत नागे यांनी दिला आहे. 

दरम्यान विशाल पाटील, विश्वजीत कदम नाराज झाले आहेत. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विशाल पाटील, विश्वजीत कदम दोघेही सध्या नॉट रिचेबल झाले आहेत.