Sangli Samachar

The Janshakti News

गलितगात्र झालेली काँग्रेस, शिल्लक शिवसेनेसमोर गुडघे टेकनार ? "की"....सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - सांगलीसह मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला तिढा सुटण्याची कुठलीही चिन्हे सध्या तरी दृष्टीक्षेपात येताना दिसत नाहीत. काँग्रेसच्या राज्य नेतृत्वासमोर आडमुठी भूमिका घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत झालेल्या महाआघाडीच्या बैठकीतही आपला हेकेखोरपणा कायम ठेवला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण सांगलीवरील हट्ट सोडणार नाही अशी भूमिका दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठी समोर मांडली. यावेळी राज्यातील व केंद्रातील काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ठाकरे यांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ठाकरे नमण्याचे नाव घेत नव्हते. त्यामुळे इतर काही मुद्द्यांवर ठाकरे आपला हट्ट सोडतात का ? याचीही चाचपणी घेण्यात आली. परंतु कोणता पर्याय नसल्याने काँग्रेसने तूर्तास तरी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेऊन तीन तारखेच्या महाआघाडीच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे ठरवले.


आता देशात गलितगात्र झालेली काँग्रेस शिल्लक शिवसेनेसमोर गुडघे टेकते की आपल्या महाराष्ट्रातील व सांगलीतील निष्ठावंत काँग्रेसच्या शिडात वारे भरते, हे सोनिया गांधी व राहुल गांधी काय भूमिका घेतात यावर अवलंबून आहे. त्यामुळे आता काँग्रेस श्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावर डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत आणि विशाल पाटील यांची भूमिका ठरणार आहे. तूर्तास सांगलीतील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते पुढील निर्णयाकडे डोळे लावून बसलेले आहेत.