Sangli Samachar

The Janshakti News

अजूनही आ. डॉ. विश्वजीत कदम हेच माझे नेते, निवडणुकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री व्हावे हेच माझे प्रामाणिक प्रयत्न - विशाल दादा| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२७ एप्रिल २०२४
मी अजूनही काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आ. डॉ. विश्वजीत कदम हेच माझे नेते आहेत. निवडणुकीनंतर मी पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात कार्यरत होईन, इतकेच नव्हे तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मनापासून प्रयत्न करेन, असे प्रतिपादन सांगली लोकसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केले.

काँग्रेस पक्षामार्फत करण्यात येणाऱ्या संभाव्य कारवाईबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विशाल दादा बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी पक्षाचा कोणताही नियम मोडलेला नाही, माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाविरुद्ध नसून काँग्रेस पक्षातर्फेच आहे. उलट भाजपाला पराभूत करणारा मी एकमेव उमेदवार आहे, गेल्या 90 वर्षात आमच्या घराण्याने काँग्रेस पक्षाची केलेली सेवा लक्षात घेऊन पक्षाने माझ्याविरुद्ध कारवाई करावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


दरम्यान विशाल दादा पायाला भिंगरी बांधून झंजावाती प्रचार दौरा करीत आहेत. काल त्यांनी शहराबरोबरच मतदार संघातील ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क साधला. यावेळी मतदारांनी त्यांना, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, तुम्ही निश्चिंत असा, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही सांगलीचे खासदार असणार आहात, असे सांगितले.

विशाल पाटील यांना मिरजेतील भाजपच्या नगरसेवकाने पाठिंबा दिल्यानंतर, जत तालुक्यातील भाजपाचे तालुका अध्यक्ष सावंत यांनी पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. यानंतर सावंत यांनी जत तालुक्यातील अनेक पदाधिकारी आपला सामूहिक राजीनामा देऊन विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरलेले दिसतील असे सांगितले. मिरज आणि जत प्रमाणेच जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना अंतस्थ पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.