Sangli Samachar

The Janshakti News

विज्ञान व तंत्रज्ञानाला विवेक असू शकत नाही, तो विवेक संस्कारातून येतो - अभय भंडारी



| सांगली समाचार वृत्त |
सांगली, दि.१४ एप्रिल २०२४ -  सर्वच क्षेत्रात विश्वास महत्त्वाचा असून, विश्वास गमावला तर तो पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे विश्वसनीयता टिकवावीच लागते, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत अभय भंडारी यांनी केले. राजमती भवन सांगली येथे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट व राजमती सार्वजनिक ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. नेमगोंडा दादा पाटील व्याख्यानमालीतील तिसरे पुष्प गुंफताना 'बदलती जीवनशैली व ढासळती मूल्ये' या विषयावर ते बोलत होते. स्वागत राजमती ट्रस्टचे सुरेश पाटील यांनी केले.

या वेळी अभय भंडारी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. जे कायदेशीर असेल ते नैतिक असेलच, असे नाही. लोक काय म्हणतात, यावर सत्याची परिभाषा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान गतीने बदलत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये झपाट्याने बदल होत असून भूतकाळामध्ये रमणे सोडले पाहिजे. संपत्ती, तंत्रज्ञान या दोन बाबी अपरिहार्य झाले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला विवेक असू शकत नाही. तो विवेक संस्करातून येतो. बौद्धिक, शारीरिक क्षमतांचा झपाट्याने रास होत आहे. मोबाईलमुळे मनोरुग्न वृत्ती वाढत चाललेली आहे. आचार, विचार संतुलित आहेत असा मनुष्य सुखी जीवन जगू शकतो. मानवी जीवनाचा सारांश, भाव-भावना, प्रेम पराधीन होत चालली आहे.


भंडारी पुढे म्हणाले की,  संपत्तीची गती स्वतः संपत्ती ठरवत असते. संपत्तीची पहिली गती म्हणजे पैशाचा सुखाने उपभोग घ्या, अन्नदान करा आणि गरजू व्यक्तीना मदत करा ही असून, दुसरी गती संपत्ती छोटी होऊ शकते. तर तिसरी गती म्हणजे संपत्ती ज्या मागनि येते त्याच मार्गान निघून जाते. त्यामुळे संपत्ती व श्रीमंतीचे आकर्षण करू नका, असे भावनिक आवाहन केले. अभय भंडारी यांनी विविध विषयांवर उदाहरणे देऊन मार्गदर्शन करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आभार धन्यकुमार शेट्टी यांनी मानले.