Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत आग, पुण्यात धग; विश्वजीत कदम यांनी स्पष्ट सांगितलं !| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.१९ एप्रिल २०२४
एकीकडे खा. संजय पाटील, विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. तर पै. चंद्रहार पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे सांगलीतील महाविकास आघाडीतील तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस व शिवसेना पक्षातील नेते एकमेकांना इशारा देताना दिसत आहेत. आता सांगलीत ही राजकीय आग कितपत पसरते याचा आगामी काळात अंदाज येईलच, परंतु याचे धग मात्र काल पुण्यातील महाआघाडीच्या प्रचार सभेत जाणवली.

पुण्यातील महाआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचार सभा ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सांगलीतील तिढ्याचा उल्लेख करून डॉ. विश्वजीत भैय्याने विशाल पाटील यांना माघारी घेण्यास सांगावे अशी मागणी केली.


सुषमा अंधारे यांच्या या मागणीचा उल्लेख करून डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, माझे पहिले प्राधान्य काँग्रेस पक्ष आहे. ते माझे कुटुंब आहे, आणि सांगलीतील काँग्रेसचा मी एक नेता म्हणून जर माझ्या कुटुंबातील कोणी नाराज असेल, तर त्याच्या पाठीशी राहणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. यावरून आता डॉ. विश्वजीत कदम हे महाआघाडीच्या प्रचार सभा मधून जरी स्टेजवर दिसले तरी त्यांचा पाठिंबा मात्र विशाल पाटील यांनाच राहील, अशी खुलेआम चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.