Sangli Samachar

The Janshakti News

दि सांगली ट्रेडर्स को-आप. क्रेडिट सोसा.लि. पतसस्थस १ कोटी ५ लाखाचा विक्रमी नफा - सुरेश पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२८ एप्रिल २०२४
सांगली ट्रेडर्स को-ऑप्रेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगली या पतसंस्थेने आदर्श निर्माण केला असून, गेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये संस्थेला १. कोटी ५ लाख रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. गेल्या ३२ वर्षाच्या कार्यकाळात संचालक मंडळांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. नियमित कर्ज वसुली करून पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. सभासदांना प्रत्येक वर्षी उच्चांकी १५ टक्के लाभांश देणारी राज्यातील नावाजलेल्या पतसंस्थेपैकी एक आहे.

पतसंस्थेचे सभासद १३२७ असून, भाग भांडवल १ कोटी ८ लाख रुपये व स्वनिधी १० कोटी ३ लाख असून ८१ कोटीच्या ठेवी ब ५७ कोटीचे कर्ज वाटप केले असून संस्थेने विविध बँकेत मिळून २५ कोटी इतकी गुंतवणूक केली आहे. संस्थेने ९८ टके कर्ज वसुली केली असून निव्वळ नफा आहे त्यामुळे यावर्षी १ कोटी ५ लाख रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा झाल्याचे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जयंतीलाल ओस्तवाल, ऑन. सेक्रेटरी राजेंद्र पाटील सर्व संचालक मंडळ तसेच व्यवस्थापक पायगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, सांगली ट्रेडर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेची स्थापना ३२ वर्षांपूर्वी झालेली असून प्रथम पासून सातत्याने अ वर्ग मिळालेला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची सोय व्हावी, त्यांची आर्थिक पत वाढावी या उद्देशाने पतसंस्थेच्या शाखेचा विस्तार करण्यात आला असून, नुकतीच कसबे डिग्रज येथे तिसऱ्या शाखेची व मिरज येथे चौथ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे. कसबे डिग्रज शाखा उदघाटनाच्या दिवशीच ३ कोटी ५० लाखाच्या ठेवी तर मिरज शाखा उदघाटनाच्या दिवशी ३ कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत.

संस्थेच्या ठेवीची सातत्याने झालेली बाढ व केलेले ९८ टक्के कर्ज वसुली, ग्राहकांना दिलेली सेवा, आदर्श, अर्थ प्रमाण यामुळे आजपर्यंत 'दीपस्तंभ पुरस्कार', बँको पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. या पतसंस्थेची स्वमालकीची मार्केट वार्ड व नेमिनाथनगर येथे वास्तु असून त्याठिकाणी लॉकर सुविधाही सभासदासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. पतसंस्थेने मालगाव या ठिकाणी ४ एकर जागा खरेदी केली आहे.

प्रणाली सॉफ्टवेअर सिस्टीम चालू करून सभासदांना आणि ग्राहकांना कमीत कमी वेळेत त्यांच्या खात्यावरील रकम एका ठिकाणाहून दुसरीकडे कोठेही पाठवण्याची सोय व्हावी याकरिता आस्टीजीएस व एनइएफटी सुविधा तसेच क्यूआर कोड प्रणाली यासारख्या नवीन डिजिटल बैंकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे संस्थेकडे बीज बिल भरणा केंद्र ही उपलब्ध आहे.

संस्थेवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणारे संस्थेचे ठेवीदार, नियमित परतफेड करणारे कर्जदार, संस्थेचे सर्व सभासद तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे बोगदान मोठे आहे. त्याचप्रमाणे सातत्याने विविध सामाजिक क्षेत्रातही संस्था कार्यरत असते. संस्थेचे संस्थापक चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचारी हे प्रामाणिक व पारदर्शक कामकाजाच्या माध्यमातून संस्थेला उच्ब शिखरावर विराजमान होण्याचा प्रयत्न करीत आहेत.