Sangli Samachar

The Janshakti News

निर्भयपणे मतदान करा, लोकशाही समृद्ध करा : सुरेखा शेख| सांगली समाचार वृत्त |
मिरज, दि.१४ एप्रिल २०२४ - उत्तम नगर येथे मिरज विधानसभा मतदारसंघ, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मिरज यांच्या सहकार्याने व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृती अभियान अंतर्गत रेड लाईट एरिया येथे जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. यावेळी सोडा आपले सर्व काम, चला करूया आपले मतदान! चुनाव नही, मतदान करे ! नवभारत का निर्माण करे ! अशा प्रबोधन पर घोषणा देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. 


प्रबोधन फेरीनंतर कॉर्नर सभेमध्ये नोडल ऑफिसर तथा उपशिक्षणाधिकारी गणेश भांबोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे, स्वीप सदस्य संगीता खटावकर, शफिया जमादार व आस्था बेघर महिला निवारा केंद्र भीमांगन महिला संस्थेचे सुरेखा शाहीन शेख यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमाचे प्रस्ताविक वेश्या एड्स मुकाबला परिषदेचे मीनाक्षी कांबळे स्वागत रेणुका काळे यांनी केले. याप्रसंगी निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी जनकल्याण आरोग्यसेवा फाउंडेशनचे रमजान खलिफा, राजेश साळुंखे सह परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.