Sangli Samachar

The Janshakti News

विशाल पाटील यांचे "लिफाफा" चिन्ह आणि इतिहास| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२२ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना "बंद पाकीट" हे चिन्ह मिळालेले आहे.

काय योगायोग पहा ! ग्रामपंचायत पासून ते अगदी विधानसभेपर्यंत कुठलीही निवडणूक असो, वसंतदादा उमेदवाराचे नाव 'बंद लिफाफ्यातून' पाठवायचे. आणि तेच नाव फायनल केले जायचे. थोडीशी कुरबुर व्हायची, पण दादांनी 'गोड' भाषेत समजावून सांगितले, की 'बंडोबा खंडोबा' व्हायचे. आज विशाल पाटील यांनी 'बंद लिफाफा' हेच चिन्ह घेऊन, एका अर्थाने वसंतदादांचा इतिहास जागृत केला आहे.


विशाल दादांची उमेदवारी नक्की झाल्यानंतर आणि त्यांना 'बंद लिफाफा' हे चिन्ह मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. एका अर्थाने विशाल दादांच्या बंडखोरीला जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी समर्थांनाच दिले आहे.

राहता राहिला प्रश्न नेते मंडळींचा. तर नेते मंडळी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवाराबरोबर राहणार हे नक्की. परंतु त्यांचे कार्यकर्ते व मुख्य म्हणजे दादा प्रेमी मतदार विशाल दादांच्या पाठीमागे राहणार, हे विशाल दादांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी नक्की झाले होते. त्यामुळे आता दादा प्रेमींना प्रतीक्षा आहे ती चार जून ची...