Sangli Samachar

The Janshakti News

अजितदादांच्या उमेदवाराच्या गाड्याची तोडफोड ; पवार गटाची भाजपच्या विरोधात आयोगाकडे धाव



सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
नवी दिल्ली - संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. तर काही राज्यांत विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी देखील आपापल्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गट आणि भाजप यांच्यातच अंतर्गत वाद पेटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडली असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरूणाचल प्रदेशमध्येही निवडणुका लढविण्याचं ठरवलं आहे. याठिकाणी लोकसभा निवडणुकांसह विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. निवडणुकासाठी प्रचाराला गेलेल्या अजितदादांच्या नेत्याची गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडली असल्याची घटना समोर आलीय. अरूणाचल प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष लिया सय्या आपल्या प्रचारासाठी गेले असता त्यांच्या गाड्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे.



लिका सय्या हे अरूणाचल प्रदेशमधले राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत. ते लोकसभा निवडणुकीसोबत अरूणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत होते. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात लिका सय्या यांचा देखील समावेश आहे. यातच प्रचाराच्या वेळी लिका सय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडली तेव्हा इशान्य भारतातील नेत्यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला. अरूणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. तर ४ जूनला निवडणुकीचे निकाल लागणार आहे. त्याआधीच झालेल्या प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधात निवडणुक आयोगात तक्रार दाखल केली आहे.