Sangli Samachar

The Janshakti News

जगातील सर्वात वयोवृद्ध गोरिल्लाने साजरा केला 67 वा वाढदिवस



| सांगली समाचार वृत्त |
बर्लिन - दि.१५ एप्रिल २०२४ -
माणसांनी आपले वाढदिवस साजरे करणे ही एक सर्वसाधारण बाब असली तरी बर्लिनमधील एका प्राणीसंग्रहालयात एका गोरिलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला हा गोरिला जगातील सर्वात वयोवृद्ध गोरिला असून त्याचे वय 67 आहे. या प्राणी संग्रहालयातीलही तो सर्वात जुना सदस्य असल्याची माहिती संग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी दिली फाटूओ असे या गोरिलाचे नाव असून त्याचा जन्म 1957 मध्ये झाला होता 1959 मध्ये त्याला या बर्लिन प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते त्याच्या वाढदिवसा दिवशी प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात फळे आणि भाज्या यांची व्यवस्था केली होती या प्राणी संग्रहालयात इतरही अनेक गोरिला आहेत.


पण हा मात्र इतरांपासून वेगळा राहतो त्याचे वय जास्त झाले असल्यामुळे त्याच्या हालचाली ही मंदावल्या आहेत म्हणून इतर गोरिलापासून त्याला वेगळे ठेवण्यात आले आहे हा गोरिला केवळ या प्राणी संग्रहातील सर्वात वृद्ध गोरिलाच नाही तरी या प्राणीसंग्रहातील सर्वात जुना प्राणीही आहे दोन वर्षांपूर्वी या प्राणी संग्रहातील एका फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यू झाला जो या संग्रहालयाचा सर्वात जुना सदस्य होता त्यामुळे आता हा गोरिला प्राणी संग्रहालयातील सर्वात जुना सदस्य आहेच शिवाय जगातील सर्वात वयोवृद्ध गोरिला होण्याचा मानही त्याला मिळाला आहे.