| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२४ एप्रिल २०२४
भ. महावीर यांच्या 2623 व्या जन्मकल्याणक निमित्त वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आरोग्य विभागांर्तगत सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकमध्ये 39 गावात एक समाजोयोगी विधायक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर, 8 शाखेमध्ये आरोग्य तपासणी शिबिर, 12 शाखेमध्ये नेत्र तपासणी शिबीर तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भगवान महावीरांनी समस्त मानवजातीला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश दिला. त्यानुसार अनेक वीर सेवा दलाच्या शाखांच्या माध्यमातून वीरसैनिकांच्या सहयोगाने या शिबिरामध्ये एकूण 1820 रक्त दात्यांनी रक्तदान केले. अनेक गावांमध्ये महावीर जयंतीच्या दोन ते तीन दिवस आधी हा उपक्रम राबविला जातो. महावीर कल्याणकाचा उत्सव धार्मिक विधी विधानासोबत समाजासाठी भरीव काम करणे गरजेचे असल्याच्या हेतूने वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आरोग्य विभागांतर्गत विविध उपक्रम हाती घेतले होते. यामध्ये अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यानिमित्ताने इ.धामणी, नृसिंहवाडी, इंगळी, जैनापूर, बुर्ली, यड्राव, दत्तवाड, नांदणी, कानडवाडी, नरंदे, मालगांव, कसबे डिग्रज, कबनूर, रुकडी, आष्टा, जैन बैर्डिंग इचलकरंजी, पिंपरी चिंचवाड, पुणे, वसगडे (कोल्हापूर), रांगोळी, नांद्रे, हरोली, वसगडे (सांगली) क.शिरगांव, वळीवडे, दुधगांव, तिळवणी, शिरदवाड, मांगुर, हुन्नर, जैनवाडी, म्हैसाळ, कवठेपिरान, आप्पाचीवाडी, भोसे, नेज, भेंडवडे, चिंचवाड (कोल्हापूर) अशा अनेक गावांनी सहभाग घेतला होता.
यावेळी विविध गावातील 1645 लोकाची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून 12 शाखेमध्ये 980 रुग्णाची तपासणी करुन त्यामध्ये त्यातील 12 रग्णांची मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया करण्यात आली. तसेच हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व मध्यवर्ती सदस्य, प्रांतिय, जिल्हा, तालुका सदस्य तसेच वीर सेवा दल शाखा संघनायक उपसंघनायक व वीरसैनिकनी, कार्यकर्ते यांचे विशेष सहभागातून हे शिबीर उत्तम पध्दतीने संपन्न झाले.