Sangli Samachar

The Janshakti News

तरुणाईच्या मेंदूचा आकार तर वाढतोय पण IQ मात्र पाण्यात



सांगली समाचार - दि. ३१ मार्च २०२४
मुंबई - जसजसे जनरेशन बदलते तसतशा सगळ्याच गोष्टींमध्ये बदल होत गेलेला आहे. अगदी लोकांचे राहणीमान, खाणे-पिणे, वागणे, शिक्षण या सगळ्याच गोष्टीत आजकाल बदल होताना दिसत आहे. परंतु एका अभ्यासानुसार असे समोर आलेले आहे की, आजकाल जन्मलेल्या लोकांचे केवळ राहणीमान नाही, तर मेंदूचा आकार देखील बदललेला आहे. आधीच्या लोकांच्या मेंदूच्या आकारापेक्षा 2010 नंतर जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार मोठा आहे. परंतु असे असले तरी त्यांचे त्यांचा बुद्ध्यांक मात्र खूप कमी असल्याचे समोर आलेले आहे. 1997 ते 2012 पर्यंत जन्मलेले लोक आणि 2010 ते 2025 या दरम्यान जन्मलेल्या लोकांच्या मेंदूच्या आकारात (Gen Z Brain Size) मोठा फरक समोर आलेला आहे. आता यावर काय रिपोर्ट आलेला आहे ते आपण पाहूया.

विद्यापीठाच्या युसी डेवीस हेल्थ रिसर्चने 1930 ते 1970 या दरम्यान जन्मलेल्या लोकांच्या मेंदूच्या आकारावर एक अभ्यास केलेला आहे. यानुसार आता असे लक्षात आले आहे की, 1980 नंतर जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार हा आधीच्या लोकांच्या मेंदूच्या आकारापेक्षा 6.6 टक्क्यांनी वाढलेला आहे. परंतु त्यांच्या मेंदूचा आकार जरी वाढला असला, तरी त्यांचा IQ लेवल खूप कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांना वयाच्या संबंधित स्मृतीभंशाचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.


या अभ्यासात असे समोर आले आहे की, तरुण पिढीच्या IQ स्कोरमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आजकाल वाढता मोबाईलचा आणि इंटरनेटचा वापर यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. त्याचप्रमाणे असे देखील समोर आले आहे की, मेंदूतील अतिरिक्त वजनाचा त्यांच्या बुद्धिमत्तेवर देखील थोडाफार प्रभाव झालेला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार असे समजले आहे की, 1970 च्या दशकात जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार हा 1930 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत 6.6 टक्क्यांनी वाढलेला आहे. आजच्या पिढीतील मेंदूचा आकार हा सुमारे 1400 मिली एवढा आहे त्याचप्रमाणे 1930 मध्ये जन्मलेल्या लोकांच्या मेंदूचा आकार 1234 मिली एवढा आहे.