yuva MAharashtra प्रतिक्षा संपणार, धाकधूक वाढणार; उद्या दुपारी लोकसभेच्या तारखांची घोषणा

प्रतिक्षा संपणार, धाकधूक वाढणार; उद्या दुपारी लोकसभेच्या तारखांची घोषणा



सांगली समाचार - दि. १५ मार्च २०२४
नवी दिल्ली - देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडून लवकरच देण्यात येईल असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले