Sangli Samachar

The Janshakti News

अपघातमुक्त महाराष्ट्रासाठी १८७ इंटरसेप्टरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणसांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्या इंटरसेप्टर वाहनाचे सारथ्य महिला चालक मोनिका साळुंखे यांनी केले. इंटरसेप्टर वाहनांमुळे रस्ता सुरक्षा अधिक सक्षम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
परिवहन विभागाच्या ताफ्यात १८७ इंटरसेप्टर वाहने दाखल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी परिवहन विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. मुख्यमंत्र्यांनी या इंटरसेप्टर वाहनांची पाहणी करुन त्यातील सुविधा आणि कार्यप्रणालीची माहिती घेतली. नरिमन पॉईन्ट येथे आयोजित कार्यक्रमास शिक्षण मंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांचेसह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.