Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नवी वाहने दाखल; गुन्हा तपासणीस मिळणार वेग !सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
सांगली - जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात आता नवी १३ वाहने दाखल झाली आहेत. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या विविध कामांसाठी 9 कोटीच्या निधीमधून नव्याने दाखल झालेल्या ३१ नवीन वाहने खरेदी करण्याथ आली. यामध्ये एक महिंद्रा थार, १२ बोलेरो, एक अत्याधुनिक डॉग व्हॅन, ८ लाईट स्ट्रायकिंग व्हेईकल आणि १० अत्याधुनिक मोटरसायकलचा समावेश आहे. या नव्या वाहनामुळे पोलिसांना पेट्रोलिंग तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचणे सोयीचे होणार आहे.