yuva MAharashtra शिंदे फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले...

शिंदे फडणवीसांचा रात्रीस खेळ चाले...



सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
नवी दिल्ली  - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांच्यामधील वाद अजूनही मिटलेला नाही. अनेक जागांवर बंडखोरीची भीती असल्याने सागर बंगल्यावर गेल्या तीन दिवसांपासून फक्त वाद मिटवण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. 

आज मध्यरात्रीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीवेळी उदय सामंत आणि शंभूराज देसाई उपस्थित होते. महायुतीमध्ये अजूनही काही वादामधील असलेल्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत खल सुरू होता. पालघर, संभाजीनगर, कल्याण, ठाणे आणि रत्नागिरीसिंधुदुर्ग जागेवर महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.