Sangli Samachar

The Janshakti News

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा यू-टर्न, लोकसभेबद्दल केली मोठी घोषणा



सांगली समाचार - दि. ३१ मार्च  २०२४
जालना -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आवाहन केलं आहे. यापूर्वी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला होता. मात्र, त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलली आहे.

या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही : मनोज जरांगे पाटील
यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं. 30 एप्रिलपर्यंत या संदर्भात निर्णय घ्या, आढावा बैठका आयोजित करा आणि मला अहवाल द्या असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, आता अहवाल आल्यानंतर मनोज जरांगे पाटील निराश झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा, अशी भूमिका जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीविषयी जाहीर केली.


आज जरांगे पाटलांनी गावागावातून अहवाल मागवला होता. मात्र, हा अहवाल अर्धवट असून गावागावतल्या मराठ्यांपर्यतचा अहवाल आलेला नाही. त्याचबरोबर या अहवालात अनेक चुकाही असल्याचं जरांगे पाटलांनी म्हंटलं आहे. त्यामुळं या अहवालावर मी अपक्ष उमेदवार देऊन मराठा समाजाची फसवणूक करणार नाही. मी मराठा समाजाची हार करणार नाही. त्यामुळं अपक्ष उमेदवार देणार नसून ज्याला पाडायचं त्याला पाडा. तुमच्या बाजून जो असेल त्याला निवडून द्या. हे मराठ्यांनी ठरवा. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पडायचं नाही, असं जरांगे पाटलांनी जाहीर केलंय. मात्र, नंतरही यांनी सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा, असं म्हणत पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आपण जी बैठक घेतली, त्यात काय करायचं हे ठरवलं होतं? मात्र, त्या दिवशी आपण निर्णय घेतला नाही. आपला करोडोनं मायबाप राज्यात आहे. निर्णय जो घ्यायचा तो ठरवूच. मात्र, गावखेड्यातल्या मराठ्यांना विचारनं गरजेचं होतं. त्यानुसार सगळ्यांनी काम सुरु केले. मात्र अहवाल वाचून जे लक्षात येतं त्याची चर्चा होणं गरजेची आहे. आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे. यात आरक्षण कुणीच घेईना उमेदवारच लई झालेत. त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय मिळत नाही. मात्र, त्यापाई आरक्षणच कुणाच्या ध्यानात येईना. राजकारणापेक्षा रक्तात आरक्षण पाहिजे. मी त्याच दिवशी सांगितलं मला राजकारण नकोय म्हणून. मला माझ्या जातीचं वाटोळं काही बनायचं नाही, असं म्हणत जरांगे पाटील अहवालावर नाराज झालेत.