सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
सांगली - शनिवार दिनांक १६ मार्च २०२४ रोजी सांगली शहर भाजप जिल्ह्याच्या वतीने भव्य ओबीसी मेळावा मार्केट यार्ड सांगली येथे पार पडला. यावेळी ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख मा. सचिन जी लंबाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली शहर जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुनील वाघमोडे यांनी ओबीसी मेळावा व नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती पत्र वाटप केले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर , सांगली लोकसभा प्रभारी दीपक बाबा शिंदे , सांगली लोकसभा समन्वयक शेखर इनामदार , शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रभाकर बाबा पाटील संगीताताई खोत ,स्वातीताई शिंदे सविता मदने दीपक माने भारत खांडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोपीचंद पडळकर शेखर इनामदार व दीपक बाबा शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या लोकसभेमध्ये मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.
या मेळाव्यासाठी संजय यमगर, सिद्धेश्वर तोडकर प्रसाद वळकुंडे ,संजय सरगर, दरीबा बंडगर , श्रीकांत वाघमोडे रमेश कारंडे, नामदेव हिप्परकर, कोमलताई चव्हाण यांच्या सह ओबीसी मोर्चाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.