Sangli Samachar

The Janshakti News

बिसूर व बामनोली ग्रामस्थांकडून आ. सुधीर दादा गाडगीळ यांचा सत्कारसांगली समाचार - दि. २० मार्च २०२४
सांगली - सांगली विधानसभा क्षेत्रातील बिसूर गावातील श्री दत्त मंदिर व बामनोळीचे श्री भैरवनाथ मंदिरासाठी व मंदिर परिसराच्या विकास कामासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश करून, मंदिराच्या विकासासाठी ३ कोटी ४३ लाख इतका निधी मंजूर करून घेतल्याबद्दल, बामनोली ग्रामपंचायतीच्या वतीने व श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या संचालकाच्या वतीने आ. सुधीरदादा गाडगीळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

सदरच्या प्रादेशिक पर्यटन निधी मधून तसेच मंदिराच्या परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, पथदिवे बसविणे आदी विकास कामाचा समावेश आहे. यामुळे या गावातील नागरिक तसेच आसपास या गावातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या निधीमुळे गावाच्या पर्यटन विकासात भर पडणार आहे.


यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश धनगर भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, गावच्या सरपंच सौ गीता ताई चिंचकर, उपसरपंच देशमुख लवटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश सनसनाटी, संतोष सरगर, अर्चना पाटील, संगीता पाटील, सुनील पाटील, उमेश वाराणकर, श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे संचालक रमेश शिंदकर,, सती शिंदकर व संदीप शिंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कामासाठी बामनोळी ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.