Sangli Samachar

The Janshakti News

12 वी ते पीएचडीपर्यंत मुलींना मिळते शिष्यवृत्ती! जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया व "सर्वकाही"..सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
मुंबई - शिक्षण मंत्रालयाने नुकताच ऑल इंडिया सर्व्हे हायर एज्युकेशन म्हणजेच एआयएएचई अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार मागील काही वर्षांच्या तुलनेत 2021-22 या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या वाढलीआहे. या काळात 2 कोटींहून अधिक मुलींनी उच्च शिक्षणासाठी नावनोंदणी केली होती. हे एकूण प्रवेशाच्या 48% होते. तर 2014-15 पासून आत्तापर्यंत उच्च शिक्षणात मुलींच्या प्रवेशात 32% वाढ झाली असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2020 मध्ये 82 लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते. यापैकी 49% म्हणजे जवळपास निम्म्या मुली होत्या.

दरम्यान सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यातून मुलींना शिक्षणासाठी मदत मिळते. आज आपण अशाच काही शिष्यवृत्ती योजना जाणून घेऊया ज्या मुलीच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकतील आणि त्यांना त्यांचे करिअर घडवण्यास हातभार लागेल, चला तर जाणून घेऊया अशा सरकारी शिष्यवृत्तींबद्दल..

Girls scholarships from 12th to Ph.D


1) इन्स्पायर-SHE
इनोव्हेशन इन सायन्स पर्सुइट फॉर इन्स्पायर्ड रिसर्चच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 2008 मध्ये ही शिष्यवृत्ती सुरू केली. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.

यासाठी 17 ते 22 वर्षे इतकी वयोमर्यादा असते. बारावी बोर्ड परीक्षेत टॉपचे 1% विद्यार्थी, JEE ॲडव्हान्स्ड किंवा NEET कोणत्याही राज्य बोर्डातील टॉप 10,000 विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय IISER, NISER, मुंबई विद्यापीठ अणुऊर्जा केंद्र विभाग – मूलभूत विज्ञान, KVPY, NTSE, JBNSTS स्कॉलर्स आणि विज्ञान ऑलिम्पिक पदक विजेते यासाठी अर्ज करू शकतात. नॅचरल आणि बेसिक सायन्सेसमधील बॅचलर आणि मास्टर्स अभ्यासासाठी दरवर्षी 80,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून (DST) याला फंडीग पुरवले जाते.

2) पोस्ट ग्रॅज्युएट इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड
मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. या माध्यमातून मुलीना महाविद्यालयात किंवा विद्यापीठातील गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच पदव्युत्तर पदवीला प्रवेश मिळतो. मास्टर्समध्ये प्रवेश घेताना मुलींचे वय 30 वर्षे असावे.

यासाठी पीजी शिकणारी मुलगी कुटुंबातील एकटी मुलगी असावी. या शिष्यवृत्तीसाठी केवळ पीजी प्रथम वर्षाची विद्यार्थीनी नोंदणी करू शकते. सलग दुसऱ्यावर्षी देखील शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पहिल्या वर्षी किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. दोन वर्षांच्या पीजी कोर्ससाठी प्रति महिना 2000 रुपये दिले जातात. यूजीसीच्या माध्यमातून याला फंडींग पुरवले जाते.

3) ‘प्रगती’ स्कॉलरशिप फॉर गर्ल स्टुडन्स्ट्स फॉर टेक्निकल एज्युकेशन
मुलींना तांत्रिक शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती 2014-15 मध्ये सुरू करण्यात आली होती. यासाठी वयाची मर्यादा नाही. याअंतर्गत मुली अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीधर या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. शिष्यवृत्तीसाठी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.

याअंतर्गत मुलींना दरवर्षी 30 हजार रुपये ट्यूशन फी दिली जाईल. ही रक्कम पुस्तके, उपकरणे, सॉफ्टवेअर, लॅपटॉप, फॉर्म फी इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. AICTE च्या माध्यमातून यासाठी निधी दिला जातो.

पीएचडी पदवी असलेल्या पण बेरोजगार असलेल्या महिला उमेदवारांसाठी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्जदार महिलेला यूजीमध्ये किमान 55% आणि PG मध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे.

याअंतर्गत महिलांना दरमहा 25 हजाराची निश्चित शिष्यवृत्ती दिली जाते. दोन वर्षांनी ती दरमहा 30,000 रुपये केली जाते. 5 वर्षांनंतर तुम्हाला प्रति वर्ष 50,000 रुपये मिळतील. यूजीसीकडून यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.

4) विदुशी शिष्यवृत्ती
ही शिष्यवृत्ती विदुशीच्या वरिष्ठ महिला शास्त्रज्ञांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. 62 वर्षापर्यंत महिला उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. सर्व महिला शास्त्रज्ञ, सरकारी कार्यालयात काम केलेल्या निवृत्त महिला शास्त्रज्ञ या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. याअंतर्गत दरमहा 75 हजार रुपये निश्चित रक्कम मिळेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून यासाठी निधी दिला जातो. वरील शिष्यवृत्तींची माहिती आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी केंद्रसरकारच्या https://scholarships.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. याठिकाणी तुम्हाला केंद्र तसेच राज्य सरकारांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती मिळेल.