Sangli Samachar

The Janshakti News

४४ व्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगली पोलीस दलातील अविनाश तानाजी लाड यांची तीन सुवर्ण पदकांची लयलूट

 


सांगली समाचार  - दि. १४|०२|२०२४

सांगली - 13 फेब्रुवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 रोजी या कालावधीत श्री शिव छत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या 44 वी राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 पुणे येथील स्पर्धेत सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलिस नाईक अविनाश तानाजी लाड यांनी महाराष्ट्र तर्फे प्रतिनिधि म्हणून सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धेतील 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे व 4x100 मीटर रिले या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन सुवर्ण पदक प्राप्त केले आहेत.

सदर क्रीडा स्पर्धेत 28 राज्यातील 4500 खेळाडूंनी विविध राज्याचे प्रतिनिधि म्हणून सहभाग घेतला होता. अविनाश तानाजी लाड यांची स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. त्यांनी केलेल्या कामगिरी बाबत पोलीस दलात व सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना मा. पोलीस अधीक्षक सो सांगली श्री संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक - रितू खोखर मॅडम, मा.पोलीस उप-अधीक्षक(गृह)श्री. अरविंद बोडके, तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र दोरकर व राखीव पोलिस उपनिरीक्षक सो श्री. मणिलाल पवार व पोलिस हवालदार अभिजीत फडतारे (प्रशिक्षक) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभलेले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.