Sangli Samachar

The Janshakti News

महायुतीला आता मनसेचे इंजिन





सांगली समाचार | दि. ०८ | ०२ | २०२४

मुंबई - शिवसेनेतील विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार भाजपाने उठवून लावले आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार याला गळाला लावले व आपली ताकद वाढवली.

आता या तीन पक्षांच्या सरकारला मनसेचे इंजिन लागणार असल्याची जोरदार चर्चा
राजकीय क्षेत्रात जोरदारपणे सुरू आहे. याला कारण घडले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची घेतलेली भेट. या घटनेला मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने दुजेरा दिला असून लवकरच मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.

आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची ताकद मिळाल्याने महायुतीचे बळ वाढण्याची चर्चाही सर्वत्र सुरू आहे. मात्र अद्याप राज ठाकरे यांनी आपली कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. यापूर्वीही राज ठाकरे यांनी विविध विकास कामाच्या चर्चेसाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. म्हणूनच हे केवळ हवेचे बुडबुडे असल्याची टीका विरोधी पक्षातून सुरू झाली आहे.