सांगली समाचार - दि. २५|०२|२०२५
नवी दिल्ली - महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मार्चमध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते. ४ टक्क्यांच्या वाढीनंतर डीए आणि डीआर ५० टक्क्यांच्या पुढे जाईल. डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी दोन वेळा वाढ केली जाते. ही दरवाढ जानेवारी आणि जुलैमध्ये करण्यात येते.
यापूर्वी डीए कधी वाढला?
डीएममध्ये शेवटची वाढ ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली होती. त्यावेळी डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर पोहोचला होता. सध्याच्या महागाईनुसार, असा अंदाज आहे की सरकार पुन्हा ४ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते. मार्चमध्ये महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा लाभ १ जानेवारी २०२४ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल.
डीए, डीआर कोणत्या आधारावर ठरवतात?
इंटस्ट्रिअल वर्कर्ससाठी डीएस केंद्र सरकार सीपीआय डेटाच्या (CPI-IW) आधारे निर्धारित करते. जे १२ महिन्यांची सरासरी ३९२.८३ आहे. यानुसार डीए हे मूळ वेतनाच्या ५०.२६ टक्के असावं. CPI-IW डेटा कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला जारी केला जातो.