Sangli Samachar

The Janshakti News

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या कन्येने हाती घेतले कमळ

सांगली समाचार  - दि. २६|०२|२०२४

चेन्नई  - कुख्यात चंदन तस्करी करणााऱ्या वीरप्पन याची मुलगी विद्या राणी हिने नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यावेळी भाजप नेते मुरलीधर राव, पोन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विद्या राणी यांनी कृष्णनगरीत पार पाडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. कुख्यात चंदन तस्करी करणााऱ्या वीरप्पन याची मुलगी विद्या राणी  हिने नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. 

यावेळी भाजप नेते मुरलीधर राव, पोन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विद्या राणी यांनी कृष्णनगरीत पार पाडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. तर पक्षात प्रवेश करत कोणाचीही जात किंवा धर्म न पाहता आणि मागासवर्गीय लोकांसाठी काम करण्याची इच्छा विद्या राणी हिने व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या काही योजना सरकारपर्यंत पोहचवणार असल्याचे ही तिने म्हटले आहे.

विद्या राणी हिने भाजपत प्रवेश केल्यानंतर असे म्हटले आहे की, माझ्या वडिलांनी निवडलेला मार्ग चुकीचा होता. परंतु त्यांनी गरिबांचा विचार केला होता. मात्र आता भाजप प्रवेश करत तिने ही गरिबांसाठी काम करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. वीरप्पन यांना दोन मुली असून विद्या राणी आणि प्रभा नावाच्या अशा दोन मुली आहेत. त्यापैकी विद्या ही मोठी मुलगी असून ती पेशाने वकील आहे.