Sangli Samachar

The Janshakti News

पुत्रासाठी जयंतराव करेक्ट कार्यक्रम करणार ? की...

सांगली समाचार - दि. २२|०२|२०२४

इस्लामपूर - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, ज्यांच्याकडे राजकारणातील धुरंदर व्यक्ती म्हणून पाहिले जाते "करेक्ट कार्यक्रम" करण्यात जयंतराव माहीर. राजकारणात प्रवेश केल्यानंतर जयंतरावांनी याच मार्गाने पत्ता कट केल्याचे बोलले जाते.

सध्या जयंतराव आपले पुत्र प्रतीक पाटील यांच्यासाठी लोकसभेचे दार ठोठावत आहेत. यासाठी त्यांनी सांगली व हातकणंगले मतदार संघात खाजगी संस्थेच्या माध्यमातून सर्वेद्वारे अंदाज घेतला. या दोन्ही मतदारसंघात प्लस मायनस बाजू आहेत. परंतु सांगलीपेक्षा हातकणंगले हा मतदारसंघ अधिक सुरक्षित असल्याचं समोर आलं. जयंतराव पाटील यांनी आता याच मतदार संघातून प्रतीकसाठी जोर लावायचे ठरवले आहे. अर्थात सर्वेतून जे निष्कर्ष आले आहेत, त्यापेक्षा वास्तविक परिस्थिती वेगळी दिसते. 

हातकणंगले हा जयंतराव अर्थात प्रतीक पाटील यांचा घरचा मतदारसंघ. महाविकास आघाडीकडून प्रतीक लढले तर राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने (किंवा पर्यायी उमेदवार) विरुद्ध प्रतीक अशी तिरंगी लढत होईल.

संकट काळात खासदार शरद पवार यांची साथ देत असलेल्या आमदार जयंत पाटील यांच्यासाठी मुलगा प्रतीक पाटील याचं राजकीय लाँचिंग हा मोठा पेच दिसू लागला आहे. यापैकी सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. हातकणंगलेत राजू शेट्टींशी महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू आहेत

अशावेळी जयंतरावांनी भाजपमध्ये यावं, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांचा हात सोडून मुलासाठी भाजपचं तोरण बांधायचं की महाविकास आघाडीत राहून दोनपैकी एक पर्याय रेटायचा, याचा निर्णय जयंतरावांना करायचा आहे. तो करताना प्रतीकचा 'पार्थ पवार' होऊ नये, याची खबरदारी ते घेतील. कारण, महाविकास आघाडीतून या दोन्ही ठिकाणी विजयाची गणितं जमवणं सोपं नाही, याची पक्की जाणीव जयंतरावांना आहे. सांगली मतदारसंघात त्यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत, त्यामानाने हातकणंगले मतदारसंघ सुरक्षित वाटतो.

घरच्या हातकणंगले मतदार संघात जयंतरावांना बेरीज तुलनेत अधिक सोपी असेल. महाविकास आघाडीकडून प्रतीक लढले तर राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने (किंवा पर्यायी उमेदवार) विरुद्ध प्रतीक अशी तिरंगी लढत होईल. त्यात जातीय समीकरणांसह कारखानदार विरुद्ध शेतकरी नेता, अशा लढ्याची शक्यता अधिक आहे. हातकणंगले मतदार संघातून प्रतीक भाजपचे उमेदकवार झाले आणि शेट्टींशी थेट सामना होईल. अशा स्थितीत आखाड्यातून बाहेर पडावे लागणारे खासदार धैर्यशील माने, पॅड बांधून बसलेले राहुल आवाडे यांचे काय, हा प्रश्‍न उरतो. अर्थात, युतीत 'आमचं काय' असे विचारण्याची मुभा मिळेल का, हा प्रश्‍न आहे. टप्प्यात आल्यावर 'कार्यक्रम' करण्याची आवड असणारे जयंतराव कोणता टप्पा निवडतात, हे पाहावे लागेल.