Sangli Samachar

The Janshakti News

बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी


सांगली समाचार  - दि. २१|०२|२०२४

नवी दिल्‍ली  - नीती आयोगाने 'ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीच्या प्रतिमानाची नव्याने आखणी' याविषयावर स्थिति पत्र जारी केले आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते, आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. विनोद के. पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे सचिव सौरभ गर्ग यांच्या उपस्थितीत हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

निरामय वृद्धत्वासाठी एक परिसंस्था विकसित करण्यासाठी कुटुंब आणि कौटुंबिक मूल्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. भारतातील निरोगी वृद्धत्वाबद्दल या अहवालाने धोरणकेंद्रित निर्देश आणले आहेत, ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी संदर्भात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी नेमके काय करायला हवे याविषयी या अहवालात नमूद केले आहे. सन्मानपूर्वक वृद्धत्व, वृद्धांना आपल्या स्वतःच्या घरी काळ व्यतीत करता यावा आणि त्यातही उत्पादकता असावी असा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा व्यापक दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य पैलूंचा समावेश असेल.

या स्थिती पत्रामध्ये केलेल्या शिफारसी आरोग्य, सामाजिक, आर्थिक/वित्तीय आणि डिजिटल या चार मुख्य क्षेत्रांतर्गत सक्षमीकरण, सेवा वितरण आणि त्यांच्या समावेशाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विशिष्ट कृतींचे वर्गीकरण करतात: ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय आणि बिगर-वैद्यकीय गरजा ओळखून त्यांच्या हितरक्षणासाठीच्या आपल्या कर्तव्यांना अधिक विस्तारत एक प्रभावी आणि समन्वयित अशी ज्येष्ठ काळजी योजना तयार करण्यासाठी बहु-आयामी धोरणाचा पुरस्कार करते.

"भारतातील ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या देखभालीत सुधारणा" हे स्थिती पत्र https://niti.gov.in/report-and-publication या संकेतस्थळावर अहवाल विभागांतर्गत वाचता येऊ शकेल.