Sangli Samachar

The Janshakti News

१८ वर्षांखालील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा

सांगली समाचार  दि. २५|०२|२०२४

नवी दिल्ली - 1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल अशी अधिसूनचा जारी करण्यात आली आहे. सोबतच 20 नव्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याच्या शिक्षेतही बदल करण्यात आला आहे.

तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार

डिसेंबर 2023 मध्ये लोकसभेने पारित केलेले तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत. लोकसभेने पारित केलेले भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा हे नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होतील, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे

भारतीय दंड संहिता - जुना कायदा

भारतीय न्याय सहिता - नवा कायदा

फौजदारी प्रक्रिया संहिता - जुना कायदा

भारतीय नागरी संरक्षण संहिता - नवा कायदा

पुरावा कायदा - जुना कायदा

भारतीय साक्ष अधिनियम - नवा कायदा

न्यायसंहितेत 20 नवे गुन्हे

सामूहिक बलात्कारात दोषी आढळल्यास 20 वर्षांचा कारावास

किंवा दोषी जिवंत असेपर्यंत तुरुंगवास

18 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा

खुनाचे कलम 302 आता 101 करण्यात आलं आहे.