Sangli Samachar

The Janshakti News

आता भितीदायक स्वप्नं पडली तर घाबरायचं नाही !
झोपेत पडणारी स्वप्नं हा आपल्या सर्वसामान्यांचा नव्हे, तर संशोधकांचाही आवडीचा विषय. विशेषतः पहाटेच्या पडणारी काही विशिष्ट संदेश देणारी स्वप्नं हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. एखादे भितीदायक स्वप्न पडलं की, त्याचा अर्थ लावण्यात दिवस जातो. प्रसंगी याची उकल करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा मदत घेतली जाते.

मात्र आता काळजीचं कारण नाही... कारण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने असा हेडबँड तयार करण्यात आला आहे, जो आपल्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. प्रोफेटिक नावाच्या एका कंपनीने हा दावा केला आहे.

HALO AI Headband असं या हेडबँडचं नाव आहे. यामध्ये कित्येक सेन्सर्स देण्यात आले आहेत, जे व्यक्तीच्या ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या सर्व माहितीचं विश्लेषण करते. ही सर्व माहिती तुम्हाला एका अ‍ॅपवर दिली जाईल. यामुळे तुम्हाला आपली अ‍ॅक्टिव्हिटी आरामात ट्रॅक करता येईल.

काय आहेत वैशिष्ट्य?

HALO AI हेडबँड हे डिव्हाईस आपल्या मनातील क्रियाकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर करतं. यामुळे झोपेत असताना आपल्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त आपली एकाग्रता वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी देखील या हेडबँडचा वापर केला जाऊ शकतो. यासाठीच्या कमांड्स हा हेडबँड तुम्हाला देऊ शकेल. शांत झोपेसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या ब्रेन वेव्ह्ज मोजून, तुम्ही कधी झोपायला हवं आणि कधी उठायला हवं याबाबत हा हेडबँड माहिती देऊ शकतो.

हा हेडबँड अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही. यावर सातत्याने रिसर्च आणि चाचण्या सुरू आहेत. यासाठी कंपनी व्हॉलेंटियर्स आणि बीटा यूजर्सचा शोध घेत आहेत. मात्र, लवकरच हा हेडबँड मोठ्या स्तरावर तयार करुन तो लाँच करणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. या हेडबँडची किंमत सुमारे 2,000 डॉलर्स असू शकते असंही मीडिया रिपोर्ट्समध्ये स्पष्ट झालं आहे.