Sangli Samachar

The Janshakti News

ॲड. उल्हास चिप्रे यांचा विविध संस्थांच्यावतीने सत्कार


सांगली समाचार  - दि. १८|०२|२०२४

सांगली -  ॲड. उल्हास चिप्रे (माजी जिल्हा सरकारी वकील) यांची - केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ नवी दिल्ली यांच्याकडून विशेष सरकारी वकील पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे

त्याबद्दल दक्षिण भारत जैन सभा, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ सांगली, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने त्यांचा सत्कार श्री. रावसाहेब पाटील, श्री विनोद पाटोळे, श्री जयंत नवले यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲड. उल्हास चिप्रे म्हणाले, माझ्या कार्यक्षेत्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, व पूर्ण गोवा राज्य येत असून मला मिळालेल्या या पदाचा उपयोग मी सरकार आणि करदाते यांच्यामधील चांगला दुवा बनण्यासाठी प्रयत्न करेन.