Sangli Samachar

The Janshakti News

टूथपेस्ट मधील नमक बघण्यापेक्षा कव्हरवरील "हे" चिन्ह पहा

 


सांगली समाचार  - दि. १६|०२|२०२४

मुंबई - आपल्या घरात अशा कित्येक वस्तू असतात, ज्या आपण वर्षांनुवर्षांपासून वापरत आलेलो असतो. पण त्यांच्यावरचा मजकूर आपण कधीही बारकाईने वाचलेला नसतो. वर वर आपण तो फक्त बघितलेला असतो. पण तो व्यवस्थित वाचणे, त्याचा अर्थ जाणून घेणे आपल्याला गरजेचेही वाटत नाही. आता हेच बघा ना टुथपेस्ट ही आपली अगदी रोजची अतिशय गरजेची वस्तू. तिच्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण या टुथपेस्टवर एक मार्किंग असतं आणि त्याचा काहीतरी अर्थही असतो, हे काही अपवाद सोडल्यास बहुतांश लोकांना माहितीही नसतं. ते मार्किंग नेमकं काय आणि त्याचा रंग आपल्याला काय सांगतो, हे एकदा बघूया...

आता हेच बघा ना टुथपेस्ट ही आपली अगदी रोजची अतिशय गरजेची वस्तू. तिच्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण या टुथपेस्टवर एक मार्किंग असतं आणि त्याचा काहीतरी अर्थही असतो, हे काही अपवाद सोडल्यास बहुतांश लोकांना माहितीही नसतं. ते मार्किंग नेमकं काय आणि त्याचा रंग आपल्याला काय सांगतो, हे एकदा बघूया... 

टुथपेस्टच्या पाकिटावर असणाऱ्या मार्किंगचा अर्थ काय?

टुथपेस्टच्या पाकिटावर असणाऱ्या मार्किंगचा अर्थ काय आणि कोणत्या रंगाच्या मार्किंगचा काय अर्थ असतो, याविषयीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत.

त्यानुसार जर तुमच्या टुथपेस्टवर काळ्या रंगाचं मार्किंग असेल तर त्याचा अर्थ असा की ते टुथपेस्ट पुर्णपणे केमिकल्सपासून तयार झालेलं आहे. जर तुमच्या टुथपेस्टवर लाल निळ्या रंगाचं मार्किंग असेल तर ते टुथपेस्ट काही नैसर्गिक घटक आणि काही औषधी वापरून तयार केलेलं आहे.

हिरव्या रंगाचं मार्किंग असणारं टुथपेस्ट पुर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं आहे. तर लाल रंगाचं मार्किंग असणारं टुथपेस्ट काही नैसर्गिक घटक आणि काही केमिकल्स वापरून तयार केलेलं आहे.पण silverhilldental.com यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार टुथपेस्टवर असणारं रंगाचं मार्किंग आणि त्यामध्ये असणारे घटक यांचा काहीही संबंध नसतो.


त्या टुथपेस्टच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान त्यांच्यावर ते मार्किंग केलेले असते. आणि तो एकप्रकारचा बारकोड असून केवळ लाईट सेन्सर मशिन्सद्वारे तो वाचता येतो.