Sangli Samachar

The Janshakti News

नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर अन्विका ऑनलाइन सर्व्हिसेसचे आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन !


सांगली समाचार  दि. १०|०२|२०१४

नागरिकांना विविध शासकीय कामासाठी अर्ज करण्याकरिता ई महासेवा केंद्र अत्यंत महत्त्वाचे असते. सांगली कॉलेज कॉर्नर्स येथील रॉयल टॉवर येथे अन्विका ऑनलाईन सर्व्हिसेस चे उद्घाटन सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

दक्षिण शिवाजीनगर परिसरातील नागरिक व या भागात असलेल्या तीन महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी हे शासनमान्य ई-महासेवा केंद्र अतिशय उपयुक्त ठरणार आहे.या महा सेवा केंद्रामध्ये खालील प्रमाणे अत्यंत माफक दरात सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे अन्विका ऑनलाईन सर्व्हिसेस चे संचालक राजेंद्र आरवाळे यांनी सांगितले.

उपलब्ध सेवा -

*  सर्व प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र

* उत्पन्न दाखला

* रहिवासी दाखला

* अधिवास प्रमाणपत्र

* नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

* एस ई सी वाहन बॅच बिल्ला व

   परमिटसाठीचा दाखला

* सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्र

* E W S 10%  आरक्षण प्रमाणपत्र (राज्य व केंद्र शासनाच्या नमुन्यातील) प्रमाणपत्र

* रेशनकार्ड नवीन व दुबार काढले जातील

* पॅन कार्ड बाबतीत सर्व काम

* नावात बदला बाबत राजपत्र (गॅझेट)

* ऐपत प्रमाणपत्र

* केंद्र व राज्य शासनाचे नोकरभरती ऑनलाईन अर्ज भरणे

* जात पडताळणी फॉर्म भरणे.


या उदघाटन प्रसंगी माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, तसेच सुरज पवार, सुरेश जाधव, राहुल साबळे, अमोल तूपलोंढे, राजेंद्र मुळीक, निखिल अंबूगोळ, बाजीराव घस्ते, प्रियानंद कांबळे, आकाश जयकर, अमेय कोलप, श्रीनाथ सावंत, त्याचप्रमाणे आरवाळे कुटुंबातील, राजेश आरवाळे, निखिल आरवाळे, निरंजन आरवाळे, सचिन आरवाळे आदि उपस्थित  होते.