yuva MAharashtra इचलकरंजी मराठा मंडळाच्या वतीने विविध विभागातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार

इचलकरंजी मराठा मंडळाच्या वतीने विविध विभागातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार




सांगली समाचार दि. १०|०२|२०२४

इचलकरंजी | युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत येथील मराठा मंडळाच्या वतीने विविध विभागातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाही 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदा उदाळे यांनी दिली.

हा पुरस्कार वितरण सोहळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवार 18 फेब्रुवारी सायंकाळी 5.30 वाजता मराठा मंडळ येथे संपन्न होणार आहे. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या शुभहस्ते वअध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्याख्याते संतोष पाटील (निपाणी) यांची उपस्थिती असणार आहे. तर वसंतराव पाटील व संभाजीराव काटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यंदाच्या पुरस्कारासाठी जीवनगौरव पुरस्कार : एच. ए. पाटील (गोविंदराव ज्युनिअर कॉलेज), हिंदुराव मोरे (इ.म.पा. विद्यामंदिर). कॉलेज विभाग : प्रा. रविंद्र पाटील (आण्णासाहेब डांगे ज्युनिअर कॉलेज). हायस्कूल विभाग : अशोक हुबळे (मुख्याध्यापक विनायक हायस्कूल), सौ. शारदा पाटील (स्वामी विवेकानंद गर्ल्स हायस्कूल). प्राथमिक विभाग : सौ. सुनंदा सावंत (इ.म.पा. विद्यामंदिर 13), शशिकांत देसाई (भारती विद्या मंदिर), अनिल कारंडे (लालबहाद्दूर शास्त्री विद्या मंदिर). बालवाडी विभाग : सौ. जयश्री पाटील (श्री.ना.बा.बालमंदिर). शिक्षकेत्तर कर्मचारी विभाग : डी. एस. पाटील (इचलकरंजी हायस्कूल, डी.के.टी.ई.) यांची निवड करण्यात आली आहे.

तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून या निवडी करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी उपाध्यक्ष सचिन हळदकर, सचिव आनंदा वाझे, खजिनदार बाळू सावंत, संचालक राजाराम लोकरे, सुनिल शेलार, वसंतराव मुळीक, राजेंद्र बचाटे, उल्हास सुर्यवंशी, सुहास जांभळे, संभाजी खवरे, प्रकाश नेमिष्टे, दादासो पाटील, गणेश घाटगे आदींसह कार्यालयीन सचिव सचिन रणदिवे उपस्थित होते.