Sangli Samachar

The Janshakti News

अरे देवा... चंद्रकांत पाटील हे काय बोलून गेले ?





सांगली समाचार दि. ०८|०२|२९२४

जळगाव - महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्षांकडून भाजपला टार्गेट केले जात आहे तशात राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींवर गोळीबाराच्या घटनेने सारे वातावरणच ढवळून निघालेले आहेत. त्यामुळे भाजपमधील नेत्यांना या परिस्थितीशी सामना करताना तोंडाला फेस येत आहे. सहाजिकच चुकून काही उलट सुलट वक्तव्य केली जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते मात्र. चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत असाच किस्सा घडला.

जळगाव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेला असताना पत्रकारांनी त्यांना घोसाळकरांच्या प्रकरणावरून महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे का ? या विरोधकांच्या आरोपात बाबत प्रश्न विचारला. त्यावेळी चंद्रकांत पाटलांच्याकडून महायुती ऐवजी महाआघाडीचे राज्य येऊ दे, असं ते चुकून बोलून गेले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनीम्हटलं की, "विरोधकांनी टीका करणं हे त्यांचं काम आहे." पण अशा घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत, प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाते आणि त्यात जे दोष आढळतील, त्यांना शासन मिळेल. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या मॉरिस एकनाथ शिंदे भेटीच्या टीकेवरही प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे हे एवढे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की दिवसभरात त्यांना साधारण 5 हजार लोक भेटतात. अनेकजण त्यांची भेट घेतात फोटोही काढतात, यावरून मुख्यमंत्री यांचे त्यांच्याशी संबंध आहेत, असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. त्यामुळे राऊत काय बोलत आहे, याकडे लोक लक्ष देईनासे झाले आहेत.

तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी खूप शुभेच्छा दिल्यात. अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्यांना खूप आयुष्य लाभू दे. त्यांची जी दूरदृष्टी आहे ती खूप विकसित होवू दे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 14 पक्षांची जी महायुती आहे तिला लोकसभेमध्ये भरघोस यश मिळू दे. विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार येऊ दे अशा शुभेच्छा मी त्यांना वाढदिवसाच्या देतो. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडून चुकून महाविकास आघाडी असा उल्लेख करण्यात आला.