Sangli Samachar

The Janshakti News

देशात समान नागरिक कायदा कधी लागू होणार? अमित शाह यांच्याकडून महत्त्वाची माहिती

 


सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४

नवी दिल्ली : व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता सम्मेलन कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री समान नागरिक कायद्याबद्दल बोलले. देशात निवडणुकीतनंतर UCC लागू होईल, असं अमित शाह म्हणाले. त्याआधी विश्लेषण होईल असं ते म्हणाले. सगळ्यांसाठी UCC राजकीय मुद्दा असू शकतो. पण तो एक सामाजिक सुधारणेचा विषय आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. कुठल्या धर्माच्या आधारावर कायदा नको, अशी देशाच्या लोकशाहीची मागणी आहे असं अमित शाह म्हणाले. देशाचा कायदा परिस्थितीच्या अनुकूल आणि जनतेच्या हिताचा पाहिजे. आमच्या संविधान सभेने अनुच्छेद-44 च लक्ष्य ठेवलं होतं. विधान मंडळ आणि संसद योग्यसमयी समान नागरिक कायदा आणेल, असं अमित शाह म्हणाले.

भाजपाची स्थापना झाली, तेव्हापासून आम्ही सांगत होतो की, 370 हटवणार, समान नागरिक कायदा आणणार, तीन तलाकची प्रथा संपवणार आणि अयोध्येत राम मंदिर बनवणार असं अमित शाह म्हणाले. संविधान सभेत जवाहर लाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आजाद, केएम मुंशी होते. सगळ्यांनीच UCC चा मुद्दा मांडला होता. समजत नाही, काँग्रेसला अचानक काय झालं? कमीत कमी आपल्या आजोबांची गोष्ट लक्षात ठेवा.

हे अमित शाह यांचं मोठ विधान

यूसीसी कायदा उत्तराखंडमध्ये लागू झालाय. याची सोशल, ज्यूडीशियल आणि वैधानिक स्क्रूटनी झाली पाहिजे, हे अमित शाह यांचं मोठ विधान आहे. उत्तराखंड सरकारने यूसीसी आणलय. निवडणुकीपर्यंत त्याची स्क्रूटनी होईल. निवडणुकीनंतर सर्व राज्य विचार करतील आणि संपूर्ण देशात यूसीसी लागू होईल. उत्तराखंडमध्ये UCC लागू झाल्यावर अमित शाह म्हणाले की, “ही सर्वात मोठी सुधारणा आहे. यूसीसीवर व्यापक चर्चा झाली पाहिजे. त्यानंतर देशात हा कायदा लागू झाला पाहिजे”

यूसीसीला हिंदू कोड बिल बोलण्यावर अमित शाह काय म्हणाले?

यूसीसीला हिंदू कोड बिल बोलल्यानंतर अमित शाह म्हणाले की, “काही लोक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हिंदू धर्माच अनुसरण करणाऱ्या लोकांनी बऱ्याच सामाजिक सुधारणा स्वीकारल्या आहेत. आम्ही हुंडा विरोधी कायदा बनवला, कोणी विरोध केला नाही. सती प्रथा बंद केली. बहुपत्नी प्रथा समाप्त केली. कोणी विरोध केला नाही. यूसीसीवरुन गैरसमज निर्माण केले जातायत”

देशातील चांगले वकील काँग्रेस पक्षात

गृहमंत्री अमित शाह टीवी9 च्या सत्ता सम्मेलनात म्हणाले की, “काँग्रेसने 10 वर्षात 12 लाख कोटीचे घोटाळे केले. देवास घोटाळा. कॉमनवेल्थ घोटाळा, समुद्रात सबमरीन घोटाळा आणि कोळसा घोटाळा केला. आता घाबरतायत. इतकी भिती वाटते, तर न्यायालयात जा. अंतरिम जामीन घ्या. देशातील चांगले वकील काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे”