Sangli Samachar

The Janshakti News

१०० फुटी मार्गावर महापालिकेची पाईपलाईन लिकेज होऊन शेकडो लिटर पाणी वाया !सांगली समाचार - दि. २२|०२|२०२४

सांगली - एकीकडे कृष्णा नदीला पाणी नाही म्हणून सांगलीकर नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले जात असताना दुसरीकडे शहरातील शंभरफुटी मार्गावर घाडगे पाटील शोरूम जवळ पाणीपुरवठा करणाऱी पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

शंभर फुटी रस्त्याचे सध्या विस्तारीकरण होत असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरावाचे काम सुरू आहे. हे काम करत असतानाच पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हे पाणी वाया जात असताना महापालिकेचे कोणी अधिकारी वा कर्मचारी पोहोचल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण ? आणि यास जबाबदार असलेल्यांवर आयुक्त कारवाई करणार का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.