सांगली समाचार - दि. २६|०२|२०२४
आंतरवाली सराटी : आंदोलन करून मागण्या मान्य मारण्याचा शब्द देवून सुद्धा फडणवीस सरकारने आपला शब्द फिरवला. त्यात मला मारण्याचा प्रयत्न केला माझ्यावर खोटे आरोप केले. त्या नैराशयातून मी फडणवीसांवर टीका केली. पण त्यात काही चुकीचं नाही, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर शेलक्या भाषेत टीका केली आहे.
मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटलांना जालना येथील भांबोरी गावात मराठा आंदोलकांनी रोखले. तसेच मुंबईला नंतर जावू, गळ घातली. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, मागील आठवड्यात फडणवीस यांनी सदावर्तेच्या आडून सलाईन लावायला सांगितले. अॅड. गुणारत्न सदावर्ते हा मराठा आरक्षणचा विरोधक आहे. त्यामुळे त्याच्या आडून फडणवीसांच कट कारस्थान करत आहेत. मी ब्राम्हणांच्या विरोधात नाही माझ्या गावात पण ब्राम्हण आहेत पण महाजन, फडणवीस हे वेगळेच आहेत. काल मराठ्यांनी शांततेत आंदोलन करून सुद्धा आंदोलकांवर राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, भाजपच्या विजयातील मी मोठा काटा आहे, असे म्हणून फडणवीसांनी माझ्यावर खोटे आरोप करायला सुरूवात केली. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांच्या मागे फडणवीसच आहे. मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देवून फडणवीस मराठ्यांची फसवणूक करत आहेत. अन् हे आरक्षण मी स्वीकारावे यासाठी फडणवीसांचा खटाटोप सुरू आहे. मला मारण्याचा डाव होता त्यांचा. त्यामुळे मीच ट्याला भेटायला मुंबईला निघालो आहे.
सर्वपक्षीय मराठ्यांनो नीट रहा
केवळ भाजपच नाही तर सर्व पक्षातील मराठा नेते व कार्यकर्ते यांनी मराठा समाजाच्या पाठीने उभे राहिले पाहिजे. मात्र, ते आंदोलना विरोधात, माझ्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय मराठ्यांनी नीट रहा, असा धमकीवजा इशारा नारायण राणेंपासून इतर सर्व मराठा नेत्यांना मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. दिला आहे.