Sangli Samachar

The Janshakti News

नैराश्यातून भावी डॉक्टरांचं टोकाचं पाऊल ?

 

सांगली समाचार - दि. २९|०२|२०२४

मुंबई - शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील नैराश्य आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) वेगाने पावले टाकायला सुरूवात केली असून या मागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या समस्येमागची नेमकी कारणे स्पष्ट झाल्यानंतर मानसिक आरोग्याच्या सुधारणेसाठी पुराव्यांवर आधारित रणनीती आखण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या पंधरा सदस्यांच्या कृती दलामध्ये 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स'मधील मनोदोषचिकित्सा विभागातील प्रो. डॉ.बी.एम सुरेश यांचा समावेश असून तेच या कृतिदलाचे अध्यक्ष आहेत. मागील काही वर्षांमध्ये वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांमधील नैराश्य वाढत चालले असून त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अँटी-रॅगिंग समितीने कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.  पाहतानाच विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण का वाढत आहे? याचाही सखोल अभ्यास करेल. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुराव्यांवर आधारित रणनीती आखण्यात येईल. ही समिती ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांना देखील भेट देईल. या समितीला अभ्यासात आढळून आलेली तथ्ये आणि अंमलबजावणी करण्याजोग्या बाबींच्या शिफारशी करण्यासाठी ३१ मे २०२४ ची मुदत ठरवून देण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेणार

हे कृतिदल प्रत्यक्षात भेटून किंवा व्हर्च्युअली बैठकीच्या माध्यमातून संपर्कात राहील. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या महाविद्यालयांना या समितीमधील सदस्य भेट देऊन तेथील अन्य विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतील. त्यांच्या मतांची केंद्रीय पातळीवरील यंत्रणा दखल घेईल, असे सांगण्यात आले.