Sangli Samachar

The Janshakti News

तूर्तास थांबा; जरांगेंचा आंदोलकांना आवाहनसांगली समाचार  - दि. १७|०२|२०२४

मुंबई - सध्या परीक्षेचे दिवस असल्याने आपल्या आंदोलनाचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलकांनी आपले आंदोलन तूर्तास थांबवावे 21 तारखेनंतर आपण याबाबत निर्णय घेऊ असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेले आहे आंदोलनाची दिशा सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांच्यात भीतीचं वातावरण व्हाययला नको. ते मोकळ्या मनानं हसत खेळत आले पाहिजे, त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. 20 तारखेनंतर आंदोलनाचं ठरवू तोपर्यंत थांबा. जरांगे पाटलांचं मराठा आंदोलकांना आवाहन केलं. मात्र अमंलबजावणी होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाज मुंबईला गेला अधिसूचना काढली हे आंदोलनाचं पहिलं यश होतं. अजूनही याची अंमलबजावणी केली नाही. त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी केली. शिंदे समितीला वर्षभराची मुदतवाढ द्या, सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी ती आम्ही दिलेल्या व्याख्याची अमंलबजावणी करा अशी मागणी केली आहे. मागासवर्ग आयोगानं किती टक्के मराठ्यांना मागास ठरवलं हे त्यांनाच माहित, 16 टकक्यावरून 12 टक्के आणि आता 10 टक्क्यांवर आलंय. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.

येत्या 20 तारखेला विशेष अधिशेषण घेवू न त्यात मराठा आरक्षणावर चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.. मात्र हे आंदोलन सगे सोयरे शब्दासाठी आहे. जोपर्यंत सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी होतनाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. तेही येत्या 20 तारखेपर्यंतच द्यावं लागेल नसता आंदोलनाची दिशा बदलावी लागेल असा इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळं आता सरकार जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे कसं पाहतं हे महत्वाचं असणार आहे.