Sangli Samachar

The Janshakti News

ठाऊक आहे का तुमच्या फोनची एक्सपायरी डेट ?

सांगली समाचार  दि. ०९|०२|२०२४

कोणत्याही साहित्याची एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेट येताच ते साहित्य वापर करण्यायोग्य राहत नाही. म्हणजेच त्या सामानाची लाइफ संपते. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, जो स्मार्टफोन तुम्ही चालवत आहात.
त्याची एक्सपायरी डेट काय आहे आणि ती कुठे लिहिलेली असते. किंवा तो फोन कधीपर्यंत चालवला जाऊ शकतो. आज स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील अविभाग्य घटक बनला आहे. आज स्मार्टफोनचा वापर केवळ कॉलिंगसाठी नाही. तर फोटोज शेअर करणे. जेवण ऑर्डर करणे आणि तिकीट बुक करण्यासाठीही केला जातोय. अशा वेळी तुम्ही हे अवश्य जाणून घेतलं पाहिजे की, तुम्ही तुमचा स्मार्टफोन कधीपर्यंत चालवू शकता आणि तो कधी एक्सपायर होईल.

स्मार्टफोनची एक्सपायरी डेट काय?
स्मार्टफोन एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ज्याच्या बॅटरीमध्ये कोणतीही इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसप्रमाणे केमिकल वापरलं जातं. जे एका काळानंतर एक्सपायर होतं. आजकालचे स्मार्टफोन हे फिक्स्ड बॅटरीसह येतात. ज्यांची बॅटरी खराब झाली तर तुम्ही ती बदलू शकत नाही. बॅटरी खराब झाल्यानंतर लोक स्मार्टफोन डंप करतात.

स्मार्टफोनविषयी बोलायचं झाल्यास, तुम्ही स्मार्टफोन कितीही वर्षे वापरला तरी तो एक्सपायर होत नाही. खरंतर स्मार्टफोनची एक्सपायरी डेट नसते. मात्र काही असे कारणं असतात, ज्यांच्यामुळे स्मार्टफोन खराब होतात. मग तुम्ही एक दिवसही फोन चांगल्या प्रकारे वापरला नाही. तरीही या समस्या येतात. स्मार्टफोनमध्ये जोपर्यंत मोठा प्रॉब्लम येत नाही. तोपर्यंत फोन काम करत राहतो. हा प्रॉब्लम म्हणजे बॅटरी, सर्किट बोर्ड किंवा वायरिंगचा असू शकतो.

किती असते स्मार्टफोनची लाइफ?
मार्केटमध्ये मिळणारा चांगल्या ब्रांडचा स्मार्टफोन वर्षानुवर्षे तुमची साथ देईल. स्मार्टफोनमध्ये असे चिप आणि पार्ट्सचा वापर केला जातो. जो दीर्घकाळापर्यंत चालतो. मात्र तरीही तुम्ही फोनचा वापर हा काळीपूर्वक करायला हवा. अनेक फोन तर 8-10 वर्षे कोणत्याही अडचणीशिवाय चालतात. मात्र तुम्हाला त्याची बॅटरी ही मध्येच बदलावू लागू शकते.

फोन नाही सॉफ्टवेअर होतं डेड
आजकाल स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्या या खूप चालाक झाल्या आहेत. जास्तीत जास्त कंपन्या 2-3 वर्षांनंतर स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट देणे बंद करतात. ज्यामुळे जास्त जुने स्मार्टफोन हे वापरण्यासारखे राहत नाही आणि मग स्मार्टफोन चांगला असला तरीही कोणताही पर्याय नसल्यामुळे तो बदलावा लागतो. कंपन्या दोन-तीन वर्षांनंतर एक्सेसरीजही तयार करणे बंद करते. ज्यामुळे ते रिपयर करताना पार्ट्स मिळत नाहीत. कंपन्या असं करतात, जेणेकरुन लोक नवीन स्मार्टफोन खरेदी करत राहतील आणि त्यांचा बिझनेस चालू राहील.