Sangli Samachar

The Janshakti News

सांगली ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ. सिकंदर जमादार

 

सांगली समाचार  - दि. २२|०२|२०२४

सांगली - सांगली ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. सिकंदर जमादार यांची निवड करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथे निवडीचे पत्र दिले. यावेळी खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, सुभाष यादव, माजी महापौर किशोर शहा उपस्थित होते. 

डॉ. सिकंदर जमादार हे गेली चाळीस वर्षे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. स्व. विष्णू आण्णा, स्व. प्रकाशबापू, स्व. मदनभाऊ यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तर साडेतीन वर्षे अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. याच बरोबर स्व. मदनभाऊ पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सतरा वर्षे संचालक व अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली.

काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते सहकार, राजकीय, सामाजिक दखल घेवून कॉग्रेस प्रदेश कार्यकारनी कडून त्यांची सांगली ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे सहकार्य लाभले. पक्षाने दिलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे मत डॉ. जमादार यांनी व्यक्त केले. या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.