Sangli Samachar

The Janshakti News

प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सन्मान

सांगली समाचार  - दि. २२|०२|२०२४

सांगली - फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, विवेकवादी विचारवंत, प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांचा पंचाहत्तरीनिमित्त जागतिक भाषाज्ज्ञ, पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते सांगलीत रविवारी (दि. २५) विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. गौतमीपुत्र कांबळे सन्मान समिती यांच्यावतीने सांगलीत बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

यावेळी प्रा. डॉ. भरत नाईक, संजय पाटील, महेश कराडकर, सुरेश भंडारे, प्रा. मिलिंद वडमारे, कैलास काळे, अॅड. सुदर्शन कांबळे उपस्थित होते. रविवारी शांतिनिकेतन येथे सकाळी १०.३० वाजता शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते 'मानवमुक्तीचा पथदर्शक' आणि 'संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी' या दोन पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, सतीश बनसोडे, अलोक जन्नाटकर उपस्थित राहणार आहेत. ११.३० ते १ .३० या वेळेत 'सांस्कृतिक युद्ध, लढा समजून घेताना या विषयावर परिसंवाद होणार कांबळे आहे. 

 यावेळी. गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, प्रा. डॉ. प्रकाश पवार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे, प्रभाकर कांबळे, ज्येष्ठ लेखक डॉ. राजन गवस, भरत शेळके, करुणासागर पगारे सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. सुनीता बोर्डे- खडसे, मनीषा पाटील या सूत्रसंचालन करणार आहेत. आमदार अरुणअण्णा लाड, नवभारत शिक्षण संस्थचे संचालक गौतम पाटील, उद्योजक अॅड. सी. आर. सांगलीकर, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रदीप दुसाद उपस्थित राहणार आहेत.