सांगली समाचार - दि. २८|०२|२०२४
सांगली - एका चॅनलवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. सदर व्हिडिओमध्ये एका अज्ञात इसमाने अख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपून टाकू, अशी जाहीर धमकी दिली. त्याबरोबरच त्यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरही एकेरी शब्दात खालच्या पातळीवर टीका केली. या व्हिडिओमुळे ब्राह्मण समाजामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सांगली शाखा व ब्राह्मण सभा सांगली यांच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये या माथेफिरू इसमाविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला.
यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष केदार खाडिलकर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मंगेश ठाणेदार ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष किशोर पटवर्धन कार्यवाह श्रीराम वेलणकर उद्योजक रवी भिडे, संदीप सोले , डॉक्टर भालचंद्र साठे , व्रतेश खाडिलकर हेमंत फाटक, सुनील कुलकर्णी , विद्याधर दांडेकर, चिंतामणी गुळवणी, योगेश कुलकर्णी श्रेयस जोशी, शामराव भिडे नाना फडणीस, चिंतामणी केळकर, धनेश कातकडे रोहन बिनीवाले ,माधव गोडबोले, संजय रुपलग, विजय भिडे यांच्या सह ब्राह्मण समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते. पोलिसानी लवकरच यावर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.