Sangli Samachar

The Janshakti News

शासनाने काढलेला जीआर अनुकंपावर अन्याय करणारा

 


सांगली समाचार  - दि. १९|०२|२०२४

मुंबई  - शासनाने काढला नवीन जीआर अनुकंपावर अन्याय करणारा आहे. प्रतीक्षा यादीत असताना 2005 नंतर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या संदर्भात कुठलाही उल्लेख यात नाही. सरकारच्या जीआरमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा. जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जीआरमध्ये डावलण्यात आल आहे. त्यामुळे आता पेन्शनधारकांची लढाई नव्याने लढावी लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकार बनवाबनवी करीत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. काँग्रेस सत्तेत आली तर महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल, अशी ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

कापूस कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी सरकारची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांवर गोळीबार केला जात आहे. शेतकऱ्यांना गोळ्या घालणारे सरकार अत्याचारी आहे. इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार पाहात आहोत. अन्नदात्याचे श्राप सरकारला लागतील. हे सरकार नालायक आहे. मुजोर आहे. मतदारच सरकार संपल्याविशिवाय राहणार नाही. टोमॅटो दाखवून डब्यात कांदा निर्यात केला जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांवर आणली जात आहे. एमएसपीच्या नावावर क्विंटलमागे लूट सुरू आहे. कापसातलावलेल्या जाचक अटींमुळे कापूस खरेदी सेंटरवरून ट्रक परत जात आहेत. शेतकरी नागवला जात असल्याचा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचा साफ उद्ध्वस्त करण्याचे काम हे त्रिपुरा भाजप सरकार करीत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदार सरकारला त्यांची औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.