Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्र सरकारला मिळणार AI ची साथ; गुगलसोबत मोठा करारसांगली समाचार  दि. ०९|०२|२०२४

पुणे - महाराष्ट्र सरकार आणि गुगल कंपनी यांच्यामध्ये AI संदर्भात करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


जगभरात सध्या एआय अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) बोलबोला सुरू आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात एआयने शिरकाव केला आहे. अशात राज्याला वेगाने पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भात करार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीपासून उद्योग ते आरोग्यापर्यंत होणार आहे.

आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भात राज्य सरकार आणि गुगल यांनी एकत्र येत शेती, आरोग्य, शिक्षण, शाश्वतता आणि स्टार्टअप क्षेत्रात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार आज पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले. गुगलच्या मदतीने भूअभिलेख व्यवस्थापन, रोगनिदान, नागरी पर्यावरण विकास आणि या क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण आदी क्षेत्रात राज्य सरकार गुगलचे सहाय्य घेणार आहे. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि गुगलचे भारत देशासाठीचे प्रमुख संजय गुप्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.