Sangli Samachar

The Janshakti News

राज्यातील 20 ते 22 आमदारांसोबत स्वत: बोललोय, ते कोठेही जाणार नाहीत; सतेज पाटलांनी दिली महत्त्वाची अपडेट

 


सांगली समाचार  - दि. १३|०२|२०२४

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार गट भाजपसोबत गेल्यानंतर मंत्री पद कोणाला मिळाले हे जग जाहीर आहे. इतर मंत्री मंडळाचा विस्तार झाला नसल्याने भाजपमधील अंतर्गत खदखद वाढणार आहे. महाराष्ट्र आणि देशात काँग्रेचा झेंडा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्हा सर्व तरुण पिढीवर आहे. काँग्रेसची ही लढाई निश्‍चितपणे जिवंत ठेवणार असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. 

अजिंक्यतारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण  यांनी काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत राज्यातील काही आमदारही जाणार आहे, अशी चर्चा दिवसभर सुरु होती. मात्र, पक्षातर्फे पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम देत काँग्रेसच्या ध्येय धोरणांची माहिती दिली.

आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात झालेल्या विविध सर्व्हेमधून लोकसभेत महाविकास आघाडीला २५ ते २६ जागा मिळतील, असे वातावरण आहे. राज्यातील वीस ते बावीस आमदारांसोबत स्वत: बोललो आहे. ते कोठेही जाणार नाहीत. याशिवाय पक्षाचे इतर नेतेही बोलत आहेत. हे सर्व आमदार काँग्रेससोबतच आहेत. त्यामुळे आणखी कोणी जातील असे वाटत नाही. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सर्व आमदारांशी चर्चा करण्याची जबबादारी आपल्यावर सोपवली आहे. त्यानूसार आज दिवसभर त्यांच्यासोबत चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली आहेत.



लोकसभेचा मूड वेगळा, महाराष्ट्रातील वेगळा 

महायुतीचा कारभार लोकांना मान्य नाही. लोकसभेचा मूड वेगळा दिसतो, महाराष्ट्रातील मूड वेगळा दिसतो. त्यामुळेच आम्ही एकत्र असणे काळाजी गरज असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.