Sangli Samachar

The Janshakti News

परीक्षेचे पेपर फुटल्याने 1.40 कोटी तरुणांचे भविष्य आले संकटात ?
सांगली समाचार  दि. ०८|०२|२०२४

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांतील परीक्षेचे पेपर फुटण्याच्या घटनांवर नजर टाकली तर कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण देश याने त्रस्त असल्याचे स्पष्ट होते. गेल्या पाच वर्षांत देशभरातील १५ राज्यांतील १ कोटी ४० लाख अर्जदारांचे करिअर यामुळे बळी पडले आहे.

या अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे १ लाख ४० हजार सरकारी नोकऱ्या मिळण्याच्या आशेने आपला वेळ, संसाधने आणि शक्ती वाया घालवली. अनेक प्रकरणांमध्ये, या उमेदवारांची प्रतीक्षा दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त होती. अशाप्रकारे पेपरफुटीचा मुद्दा राज्यांसाठीच नव्हे, तर केंद्रासाठीही आव्हान बनला आहे.

नेमके पेपर काेणत्या राज्यात कसे फुटले?
सर्व राज्यांमध्ये पेपर फुटण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आसाममध्ये परीक्षा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली. राजस्थानमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने सरकारी कार्यालयातून पेपर चोरला होता. मध्य प्रदेशमध्ये आरोपीने मुंबईतपरीक्षा आयोजित करणाऱ्या एका खासगी कंपनीचा सर्व्हर हॅक करण्यात यश मिळवले, तर महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याचा दावा करत पोलिसांशी संपर्क साधला.

पेपर लीकनंतर पुन्हा परीक्षा कधी?
किमान १५ प्रकरणांमध्ये परीक्षा पेपर लीक झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर घेण्यात आल्या. चार प्रकरणांमध्ये प्रतीक्षा दोन वर्षे चालली. सात प्रकरणांमध्ये अद्याप उमेदवार प्रतीक्षा
करीत आहेत.

गुजरातमध्ये काय?
गुजरातमध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये लिपिक, कार्यालयीन सहायकांच्या ४,००० पदांसाठी ६ लाख उमेदवार भरती परीक्षेला बसले होते. परीक्षा रद्द झाल्यानंतर ती एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आली.

सर्वाधिक पेपर लीक कुठे ?


(माहिती व छायाचित्र स्रोत - दै. लोकमतवरून साभार)