yuva MAharashtra विनापरवाना जाहिरात फलक बोर्ड प्रसिध्द करणाऱ्यावर होणार फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई

विनापरवाना जाहिरात फलक बोर्ड प्रसिध्द करणाऱ्यावर होणार फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५

मा. आयुक्त यांचे आदेशाने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती निहाय तात्पुरत्या स्वरुपात जाहिराती लावण्याकरीता मा. आयुक्तसो यांनी जागा निश्चित केल्या आहेत.

 प्रभाग समिती क्र. १ मध्ये १५ ठिकाणे, प्रभाग समिती क्र. २ मध्ये १२, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये १५, प्रभाग समिती क्र. ४ मध्ये ११ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्याबाबत जाहिर आवाहन करुन माहिती प्रसिध्द केली आहे. त्यानुसार प्रभाग समिती मध्ये सहा. आयुक्त यांचेमार्फत तात्पुरत्या जाहिरातीच्या परवानगीची कार्यवाही चालू आहे.

डिजीटल फ्लेक्स छपाई करणारे तसेच शहरामधील विनापरवानगी जाहिरातबाजी करुन, मा. उच्च न्यायालय यांचे झाले आदेशाचा अवमान करणे, तसेच महाराष्ट्र जाहिरात अधिनियमाचे उल्लंघन करणे याबाबी निदर्शनास येत असल्याने, मा. उपायुक्त निखिल जाधव यांनी सर्व संबंधित डिजिटल फ्लेक्स छपाई व्यावसायिक यांची बैठक घेऊन त्यांना महाराष्ट्र जाहिरात अधिनियम २०२२ व मा. उच्च न्यायालय जनहित याचिका १५५/२०११ ची माहिती दिली.

यापुढे विनापरवाना जाहिरात लावता येणार नाहीत, तात्पुरती जाहिरात प्रसिध्दिसाठी सहा. आयुक्त यांचेकडे रितसर अर्ज करुन संबंधित पोलिस ठाण्याची जाहिरात मजकूर व जाहिरात प्रसिध्दी बाबत नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणेची आहे. परवानगी दिलेल्या जाहिरातीवर जाहिरात प्रसिध्द कालावधी / जाहिरात नाव / छपाईचे ठिकाण QR कोड द्वारे प्रसिध्द करणे बंधनकारक असणार आहे, 

असा QR कोड नसणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा सुचना बैठकीत मा. उपायुक्त निखिल जाधव यांनी दिल्या आहेत.