| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ९ जून २०२५
भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सौ मेघा धाडे पावसकर या सोमवार दिनांक ९ आणि मंगळवार दिनांक १० जून २०२५ रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत असून सोमवार दिनांक ९ रोजी दिवसभर इस्लामपूर येथे सांस्कृतिक प्रकोष्ट च्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या उपस्थित राहतील. मंगळवार दिनांक १० जून रोजी सकाळी ९ वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर येथे स्थानिक कलाकारांची त्या संवाद साधणार आहेत.
तरी या दोन्ही कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या सभासदांनी आणि कलाकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन,
ओमकार शुक्ल भाजप प्रदेश सांस्कृतिक आघाडी उपाध्यक्ष यांनी केले आहे.