yuva MAharashtra लठ्ठेच्या श्रीमती इंदिरा बाबगोंडा पाटील चिल्ड्रन्स अकॅडमीचा दहावीचा १०० % निकाल !

लठ्ठेच्या श्रीमती इंदिरा बाबगोंडा पाटील चिल्ड्रन्स अकॅडमीचा दहावीचा १०० % निकाल !

| सांगली समाचार वृत्त |
सांगली- दि. १५ मे २०२५

सांगली दि.१४: लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या इंदिरा बाबगोंडा पाटील इंग्लिश अकॅडमीचा मार्च २०२५ च्या दहावी बोर्ड परीक्षेत १००%निकाल लठ्ठेच्या श्रीमती इंदिरा बाबगोंडा पाटील चिल्ड्रन्स अकॅडमीचा दहावीचा १०० % निकाल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या इंदिरा बाबगोंडा पाटील इंग्लिश अकॅडमीचा मार्च २०२५ च्या दहावी बोर्ड परीक्षेत १००%निकाल लागला.

सांगली शहरातील नामवंत अशा या इंग्रजी माध्यम शाळेने १००%निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.यावेळी निकालात ११ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता , ९ प्रथम श्रेणी तर 2 द्वितीय श्रेणी प्राप्त आहेत. शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल विविध स्तरातून संस्था, शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

बोर्डाच्या परीक्षेत झळकलेले मुग्धा महाबळ ९८.६०%, सूजल सावर्डे ९७.२०%,कावेरी कुलकर्णी ९४.२०%, सुनिधी पाटील ९३.८०%,क्षितीजा शिंदे ९१.८०%व दिशा कोरे ९०.४० या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समिती सदस्य दिपक पाटील व जयंत नवले वकील यांच्या हस्ते झाले व त्यांनी यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.दिपक पाटील व नवले वकील यांनी चांगला निकाल लागल्याने संस्था व शाळेच्या वैभवात भर पडल्याचे सांगून विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम केल्याने आणि शाळेने त्यांना यथोचित मार्गदर्शन केल्याने हे यश मिळाले आहे असे नमूद केले.
यावेळी प्राचार्य मार्था बिट्टी यांनी संस्थेचे सहकार्य, शिक्षकांचे उत्कृष्ठ अध्यापन व लक्ष आणि पालकांचा सहभाग याचा खास उल्लेख करुन सर्वाचे अभिनंदन केले.यावेळी विद्यार्थी व शिक्षक मनोगते झाली.
स्वागत व सूत्रसंचालन पल्लवी पाटील यांनी केले. आभार सरीता पाटील यांनी मानले.

यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सांगली शहरातील नामवंत अशा या इंग्रजी माध्यम शाळेने १००%निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.यावेळी निकालात ११ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता , ९ प्रथम श्रेणी तर 2 द्वितीय श्रेणी प्राप्त आहेत. शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल विविध स्तरातून संस्था, शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

बोर्डाच्या परीक्षेत झळकलेले मुग्धा महाबळ ९८.६०%, सूजल सावर्डे ९७.२०%,कावेरी कुलकर्णी ९४.२०%, सुनिधी पाटील ९३.८०%,क्षितीजा शिंदे ९१.८०%व दिशा कोरे ९०.४० या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समिती सदस्य दिपक पाटील व जयंत नवले वकील यांच्या हस्ते झाले व त्यांनी यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दिपक पाटील व नवले वकील यांनी चांगला निकाल लागल्याने संस्था व शाळेच्या वैभवात भर पडल्याचे सांगून विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम केल्याने आणि शाळेने त्यांना यथोचित मार्गदर्शन केल्याने हे यश मिळाले आहे असे नमूद केले.
यावेळी प्राचार्य मार्था बिट्टी यांनी संस्थेचे सहकार्य, शिक्षकांचे उत्कृष्ठ अध्यापन व लक्ष आणि पालकांचा सहभाग याचा खास उल्लेख करुन सर्वाचे अभिनंदन केले.यावेळी विद्यार्थी व शिक्षक मनोगते झाली. 
स्वागत व सूत्रसंचालन पल्लवी पाटील यांनी केले. आभार सरीता पाटील यांनी मानले.

यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते