yuva MAharashtra मिरजेमध्ये ‘पाकिस्तानी फॅशन’चा डिजिटल फलक हटवला; शिवप्रतिष्ठानचा तीव्र विरोध !

मिरजेमध्ये ‘पाकिस्तानी फॅशन’चा डिजिटल फलक हटवला; शिवप्रतिष्ठानचा तीव्र विरोध !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २४ एप्रिल २०२५

मिरज शहरातील ब्राह्मणपुरी परिसरात अनम नावाच्या महिलांसाठीच्या टेलरिंग व फॅशन डिझायनिंग दुकानात 'पाकिस्तानी फॅशन'चे लेबल असलेले महिला कपडे विक्रीस ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली.

संघटनेचे प्रमुख विनायक माईंणकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी संबंधित दुकान बंद असल्याचे पाहिले, मात्र दुकानासमोर लावलेला ‘पाकिस्तानी ड्रेस’ असा उल्लेख असलेला डिजिटल फलक त्यांनी तात्काळ हटवून नष्ट केला.


काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निषेध नोंदवत शिवप्रतिष्ठानने मिरजमधील अशा दुकानदारांना इशारा दिला आहे की, पाकिस्तानशी संबंधित फॅशन किंवा उत्पादने विक्रीस ठेवू नयेत. अन्यथा कार्यकर्त्यांकडून थेट दुकानात प्रवेश करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा माईंणकर यांनी दिला. शहरात अशा प्रकारचे साहित्य खुलेआम विकले जात असल्याने, स्थानिक नागरिकांतही चिंता व्यक्त केली जात आहे.